संवादातील अडथळे दूर करायचे कसे?

कुठल्याही काळात पालकांना धावपळीचं आयुष्य चुकलेलं नाहीये. सध्या तर स्पर्धेचं युग. पालकांना जसं नोकरीच्या ठिकाणी परफॉर्मन्सचं प्रेशर असतं तसंच उत्तम अभ्यास करण्याचं आणि ट्रेंडीग राहण्याचं प्रेशर मुलांनाही आहेच. त्यामुळं आपण त्यांच्याशी सातत्यानं बोलत राहायला हवं. त्यांना बोलतं करत राहायला हवं. अनेकदा पालक आणि मुलांमध्ये संवाद बिनसला की त्यांच्यात गॅप यायला लागते. पालकांना बऱ्याचदा मुलांशी काय अन कसं बोलावं हेच समजत नाहीत. www.seekhlo.com च्या कोर्समधून मुलांशी प्रभावी संवाद कसा साधावा याचं मस्त मार्गदर्शन दिलेलं आहे.
त्या सोबतच इथं आम्ही मुलांशी कधी, कसं काय काय बोलता येईल या संदर्भात काही टिप्स शेअर करतोय.

* दिवसभर कितीही कामात असलात तरी मुलांशी गप्पा मारायला नक्की वेळ काढा.

* तुम्ही करत असलेल्या कामात मुलांना सहभागी करून घ्या. तुमच्या कामाविषयी त्यांच्याशी बोला. त्यांच्या जगाविषयी माहित करून घ्या.

* पाहुण्यांसमोर किंवा एखाद्या ठिकाणी, समारंभात, रस्त्यावर मुलांना अपमानकारक बोलू नका.

* मुलांनी एखादं चांगलं काम केलं, अभ्यासात चांगले मार्क्स मिळवले तर त्याच्या वयाला साजेशी भेटवस्तू त्यांना द्या. त्यांचं कौतुक करा.

* मुलांमध्ये असलेल्या उणिवांबाबत त्यांना येता-जाता टोमणे मारू नका.

* आपल्या मुलाची दुसऱ्या मुलांबरोबर तुलना करू नका.

* अतिशिस्त नको. त्यांच्याकडून झालेल्या चुकांचे समर्थन करू नका. उलट या चुकीमुळे होणारे नुकसान आणि तोटे नीट समजावून सांगा.

आणि हो, अजून तपशीलने मुलांची मानसिकता समजून घ्यायची असेल तर आजच www.seekhlo.com वर जा आणि The art of communicating with teenagers हा कोर्स करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *