टीन टॉक (मराठी)
जिंका, कला- किशोरवयीन मुलांसोबत संवाद साधण्याची!
- इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेत उपलब्ध
- ॲनिमेटेड व्हिडीओ
- परस्परसंवादी उपक्रम
- प्रमाणपत्र
Rs 699
Rs 1,499
( inclusive of gst )
या प्रशिक्षणातून तुम्ही काय शिकाल?
किशोरावस्थेतील वागणूक बऱ्याचदा गोंधळात टाकणारी असते. कधीकधी ते अतिशय परिपक्वपणे वागतात, तर कधीकधी आक्षेपार्ह, बेजबाबदार, लहरी, रागीट आणि कल्पना ही करता येणार नाही असे वागताना दिसतात. मुलांसोबत मैत्रीपूर्ण संवाद साधण्याचा पालक अनेकवेळा प्रयत्न करतात आणि ते प्रयत्न बऱ्याचदा फसतात. अशावेळी त्यांना असहाय्य वाटते. बहुतेक वेळा अशा पाठशिवणीच्या खेळानंतर हमखास कानावर येणारी वाक्य म्हणजे “हल्लीची मुलं ना… कठीण आहेत.” किंवा “माझे पालक कुठल्या जगात राहतात कळत नाही.”
पालकांना मुलांच्या अशा वागणुकीचा त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर परिणाम होईल अशी चिंता भेडसावत असते. तथापि, या अशा वर्तनाचे शास्त्रीय कारण समजल्यास पालक आणि मुलांमधील संवाद अर्थपूर्ण आणि विधायक होऊ शकतो. शिवाय यामुळे त्यांच्या निरोगी वाढ आणि विकासासाठी एक अनुकूल वातावरण देखील तयार होते. सुसंवाद ही दृढ नातेसंबंधांकडे नेणारी पहिली पायरी आहे.
एका तासाच्या या छोट्या कोर्सद्वारे आपण किशोरांचा मेंदू कसे कार्य करतो आणि किशोरांशी प्रभावीपणे संवाद कसा साधायचा हे जाणून घेऊ शकाल. म्हणूनच पालक, शिक्षक, मार्गदर्शक आणि या वयोगटाबरोबर काम करणाऱ्या सर्वांचे स्वागत आहे!
कोर्स मोड्यूल्स
वैशिष्ट्ये
- वेळ : १ तास
- भाषा : मराठी
- प्रशिक्षण अवधी - प्रशिक्षण सुरु केल्यापासून ३० दिवसांपर्यंत
- व्हिडीओज
- उपक्रम
- प्रश्नोत्तरे
- डाऊनलोड साहित्य
- मोठ्या संस्थांसाठी राबविण्यास, 'ऍडमिन पॅनल' सुविधा