आपल्या मुलांचे करिअर बडी व्हा!
आपल्या मुलाच्या करिअर निर्णय प्रक्रियेत सोबती होणे ही पालकांची एक महत्त्वाची भूमिका आहे. यासाठी सक्षम व्हा आणि आपल्या मुलांचे करिअर बडी बना!
- इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेत उपलब्ध
- ॲनिमेटेड व्हिडीओ
- परस्परसंवादी उपक्रम
- प्रमाणपत्र
Rs 1,499
Rs 2,499
( inclusive of gst )
या प्रशिक्षणातून तुम्ही काय शिकाल?
मुलांचं करिअर हे केवळ १० वी किंवा १२वी मध्ये एकदाच निवडलेला पर्याय नाही. ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. करिअर बाबत सतत होणाऱ्या बदलांमुळे पालकांनी करिअर निवड प्रक्रियेमध्ये आपल्या मुलाचे सोबती बनणे आणि या प्रवासाचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे.
३ तासांच्या या कोर्सद्वारे आपण करिअरच्या विविध क्षेत्रांबद्दल आणि प्रत्येक क्षेत्रात उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संधींबद्दल अधिक जाणून घ्याल. तसेच आपल्या मुलाची आवड आणि अभिक्षमता विनामूल्य करिअर परीक्षणाच्या मदतीने आपण जाणून घेऊ शकाल. आणि व्हिजन बोर्ड तयार करण्यासारख्या एका कल्पक कृतीतून मुलांच्या करिअरची आखणी करण्यास हातभार लावू शकाल.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही, मुलांच्या आनंद आणि यशाच्या मार्गावरील करिअर बडी बनाल.
हे प्रशिक्षण कशासाठी?
पालक, शिक्षक आणि मार्गदर्शक हे मुलांच्या आयुष्यातील हितचिंतक असतात. पण २१ व्या शतकातील नवीन आव्हानांमुळे मुलांचे करिअरचे मार्ग हे त्यांच्या स्वतःच्या मार्गांपेक्षा खूपच भिन्न आहेत. कल्पना करा, जर, या संदर्भात पालक सक्षम झाले तर मुलांच्या करिअर निवडीच्या प्रक्रियेला अगदी इयत्ता ८वी पासून देखील सुरुवात होऊ शकेल. प्रत्येक मूल वेगळे असते, प्रत्येक मुलात वेगवेळ्या क्षमता असतात. मुलांच्या या क्षमता ओळखून त्या वृद्धिंगत करण्यासाठी पालकांना या कोर्सची नक्की मदत होईल.
म्हणूनच पालक, शिक्षक, मार्गदर्शक आणि या वयोगटाबरोबर काम करणाऱ्या सर्वांचे स्वागत आहे!
कोर्स मोड्यूल्स
वैशिष्ट्ये
- वेळ : ३ तास
- भाषा : मराठी
- प्रशिक्षण अवधी - प्रशिक्षण सुरु केल्यापासून ३० दिवसांपर्यंत
- व्हिडीओज
- उपक्रम
- प्रश्नोत्तरे
- डाऊनलोड साहित्य
- संदर्भ साहित्य
- मोठ्या संस्थांसाठी राबविण्यास, 'ऍडमिन पॅनल' सुविधा