कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाचा प्रतिबंध - कायदा आणि त्यापलीकडे (Advance Level)
POSH कायदा २०१३, वरील ऑनलाईन अभ्यासक्रम
- इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेत उपलब्ध
- ॲनिमेटेड व्हिडीओ
- परस्परसंवादी उपक्रम
- प्रमाणपत्र
Rs 1,999
Rs 2,499
( inclusive of gst )
अभ्यासक्रमाची माहिती
सध्या सर्वच क्षेत्रात - जसे की राजकारण, समाजकारण, व्यवसाय आणि इतर सर्व क्षेत्रात स्त्रिया, पुरुषांच्या बरोबरीने जरी काम करत असल्या तरी त्यांना स्त्री-पुरुष भेदभावाला सामोरे जावे लागते आणि त्यामुळे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या घटना घडतात. प्रत्येक व्यक्तीचा – ‘सुरक्षित कामाचे ठिकाण’ हा घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे भारत सरकारने, ‘कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३’ पारित केला जो POSH कायदा म्हणून ओळखला जातो. या कायद्याचे प्रत्येक संस्थेने / कंपनीने पालन करणे बंधनकारक आहे.
Prevention of Sexual Harassment at Workplaces (POSH) या कायद्यानुसार, प्रत्येक संस्थेला आपल्या कर्मचाऱ्यांच्या प्रति संवेदनशील राहून प्रशिक्षित अशी अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. परंतु प्रत्यक्षात या गोष्टींची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले आहे.
या प्रशिक्षणात एकसारखेपणा आणण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘श्यामची आई फौंडेशन, पुणे’ या संस्थेने हा ऑनलाइन अभ्यासक्रम तयार केला आहे. या प्रशिक्षणामुळे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाला प्रतिबंध करण्यासाठी आणि त्या छळाच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यासाठी संस्थेला / कंपनीला योग्य ते मार्गदर्शन व माहिती मिळू शकेल. तसेच या प्रशिक्षणाचा उपयोग कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, विश्वास आणि प्रामाणिकपणा ही मूल्ये रुजण्यासाठी होऊन लैंगिक छळाचे प्रमाण देखील कमी होऊ शकेल.
अत्याधुनिक धोरण असलेल्या उपयुक्त आणि माहितीपूर्ण अशा या ऑनलाईन प्रशिक्षणामुळे, या विषयाशी निगडीत सर्व व्यक्ती जसे की नियोक्ता, अंतर्गत समिती सदस्य आणि कर्मचारी इत्यादी घटकांपर्यंत ही चळवळ पोहोचेल आणि त्यामुळे ‘PUSH – People United against Sexual Harassment’ ही मोहीम – कामाचे ठिकाण आणि संपूर्ण समाज, ‘लैंगिक छळमुक्त’ होण्यासाठी हातभार लावेल.
हे प्रशिक्षण कशासाठी?
पॉश कायदा, २०१३ - कलम १९, कलम २४ (अ) आणि नियम १३(फ) चे अनुपालन करणारा ऑनलाइन अभ्यासक्रम:
- प्रत्येक नियोक्ता जागरूकता कार्यक्रम आयोजित करू शकेल
- सदस्य आणि कर्मचार्यांच्या संवेदनशीलतेसाठी अनिवार्य प्रशिक्षण
हे प्रशिक्षण कोणासाठी आहे?
हे प्रशिक्षण अंतर्गत समिती सदस्य, संस्थांचे प्रमुख आणि उच्च व मध्यम व्यवस्थापन यांच्यासाठी उपयुक्त आहे.
कोर्स मोड्यूल्स
वैशिष्ट्ये
- वेळ : साधारण ७ तास
- भाषा : मराठी
- प्रशिक्षण अवधी - प्रशिक्षण सुरु केल्यापासून ३० दिवसांपर्यंत असेल.
- व्हिडीओज
- उपक्रम
- स्वगत आणि अनुभव
- प्रश्नोत्तरे
- डाऊनलोड साहित्य
- संदर्भ साहित्य
- मोठ्या संस्थांसाठी देखील राबविण्यास, वापरण्यास आणि अंमलबजावणी करण्यास अत्यंत सोपे प्रशिक्षण.
“It was really eye-opening. The course is hard hitting, thought provoking and really engaging and because it was online it is very easy to access. It’s a course that that made me question all the inherent biases that all of us carry.”